तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार; भावाने केली सुटका

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

कोलकताः पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या लक्झरी बसमध्ये तीन वर्षाच्या मुलीवर 45 वर्षाच्या क्लिनरने बलात्कार केला. पीडित मुलीच्या पाच वर्षाय भावाने यावेळी आरडा-ओरड करत बहिणीची सुटका करत बलात्कार करणाऱयाला पकडून दिल्याची घटना सोमवारी (ता. 5) येथे घडली.

लक्झरी बस उभी केलेल्या जागेजवळ पीडित मुलगी आणि तिचा भाऊ चेंडू खेळत होते. तीन वर्षांची चिमुकली बसमध्ये गेल्यानंतर शेख मुन्ना याने बसचा दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार करत होता. पाच वर्षाचा भाऊ मोठ-मोठ्याने आवाज देत जोरात दरवाजा ढकलत होता. परंतु, बसचा दरवाजा उघडत नव्हता. बसमधून बहिणीचा रडण्याचा आवाज येत होता. यामुळे तोही मोठ-मोठ्याने ओरडत व पळत आईकडे गेला. आई व शेजारी नागरिकांनी तत्काळ बसकडे धाव घेतली. यावेळी चिमुकली बसच्या सीटवर पडली होती. शिवाय, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. नागरिकांनी मुन्नाला ताब्यात घेत चोप दिला.

पीडीत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुन्नाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पीडित मुलीच्या काकाने दिली.

Web Title: kolkata news 3 year old brutally raped inside parked bus by cleaner

टॅग्स