वेगळा गोरखालॅंडमुळे बंगाल सिक्कीममध्ये वाद

श्‍यामल रॉय
रविवार, 3 सप्टेंबर 2017

गुरंगला पळून जाण्यास सिक्कीम पोलिसांनी मदत केल्याचा आरोप

कोलकता : दार्जिलिंगमधील वेगळ्या गोरखालॅंडसाठी सुरू असलेल्या चळवळीमुळे पश्‍चिम बंगाल आणि सिक्कीम यांच्यातील वाद आता वाढू लागला आहे. पश्‍चिम बंगाल पोलिसांनी एका रिसोर्टवर छापा टाकून गोरखा जनमुक्ती मोर्चाचा नेता बिमल गुरुंग याला अटक करण्यासाठी गेलेल्या पश्‍चिम बंगलाच्या पोलिसांना हात हलवीत परतण्याची वेळ आली. सिक्कीम पोलिसांनी बिमल गुरंग याला पळून जाण्याची परवानगी दिल्याचा आरोप पश्‍चिम बंगालने केला आहे.

पश्‍चिम बंगाल पोलिसांनी सिक्कीम पोलिसांना बिमल गुरंग आणि रोशन गिरी यांना याला अटक करण्यासाठी रिसोर्टवर छापा टाकण्याबाबतची माहिती दिली होती. त्याशिवाय बंगाल पोलिसांनी एक लूकआउट नोटीसही काढली होती. आपल्याला या रिसोर्टवर छापे टाकण्याबाबत सिक्कीम पोलिसांनी रोखले, असा आरोपही पश्‍चिम बंगालच्या पोलिसांनी केला आहे.

बंगाल सीमेवरील नामची आणि मेली पोलिस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या गुरंगच्या समर्थकांना नेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली नाही. गुरंगला अटक करण्यासाठी बंगाल पोलिसांनी सिक्कीम न्यायालयाचे ट्रान्झिट रिमांड हवे असल्याची माहिती सिक्कीम पोलिसांनी न्यायालयात दिली. बंगाल पोलिसांनी सांगितले, की आपण आपल्या समकक्ष सिक्कीम पोलिसांना कायदेशीर कागदपत्र तयार करण्यासाठी सांगत होते मात्र सिक्कीम पोलिसांनी बंगालच्या पोलिसांना त्यापासून रोखले. बिमल गुरंग हा बिना चपलाचाच पळून गेला.

Web Title: kolkata news gorkhaland Movement and bangal sikkim