दार्जिलिंगमधील अस्थिरतेचा चहाच्या निर्यातीला फटका

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

कोलकता - दार्जिलिंगमधील राजकीय अशांततेमुळे चहा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज "इक्रा' या पतमानांकन संस्थेने व्यक्त केले आहे.

कोलकता - दार्जिलिंगमधील राजकीय अशांततेमुळे चहा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज "इक्रा' या पतमानांकन संस्थेने व्यक्त केले आहे.

इक्राने ताज्या अहवालात म्हटले आहे, की दार्जिलिंगमध्ये सध्या राजकीय अशांतता निर्माण झाली आहे. यामुळे या विभागातील चहाच्या मळ्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. दुसऱ्या हंगामातील चहाचे उत्पादन सुरू होण्याच्या तोंडावर नेमके हे घडत आहे. दुसऱ्या हंगामातील चहाची पूर्णपणे निर्यात होते आणि याचा भावही अन्य चहापेक्षा जास्त असतो. येथील बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे या विभागाला शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. राजकीय अस्थिरता आणखी काही काळ राहिल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम चहाचे उत्पादन आणि निर्यातवर होतील.

दार्जिलिंगमध्ये वर्षभरात पाच हंगामातील चहाचे उत्पादन होते. दुसऱ्या हंगामातील चहाचे उत्पादन मे अखेर/जून प्रारंभ ते जुलै प्रारंभ या काळात होते. या चहाला भाव अधिक असण्यासोबत निर्यातीतही यालाच अग्रकम आहे. दार्जिलिंगच्या चहा उत्पादनात या चहाचा वाटा 20 ते 35 टक्के असला, तरी उत्पन्नातील वाटा मात्र, यापेक्षा खूप अधिक आहे.

Web Title: kolkata news marathi news sakal news tea news darjiling news

टॅग्स