मोबाईल क्रमांक "आधार'शी जोडणार नाही : ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

कोलकाता: माझा मोबाईल क्रमांक बंद केला तरी तो मी "आधार' क्रमांकाशी जोडणार नाही, असे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सांगत केंद्र सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.

कोलकाता: माझा मोबाईल क्रमांक बंद केला तरी तो मी "आधार' क्रमांकाशी जोडणार नाही, असे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सांगत केंद्र सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.

ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली. "आधार' सक्तीबाबत बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, की आधार क्रमांक मोबाईलशी जोडणे हा गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. त्यामुळे पती-पत्नीचे फोनवरील संभाषणही जगजाहीर करता येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मोबईल क्रमांक आधारला जोडण्याच्या निर्णयाचा माझ्यासह अन्य लोकांनीही विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले. नोटाबंदीच्या निषेधार्थ 8 नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्यात येईल व राज्यभरात तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे हाती घेऊन रॅली काढतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

दूरसंचार मंत्रालयाने मोबाईल क्रमांक आधारशी जोडण्याचे आदेश काढले असली, तरी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मोबाईल क्रमांक आधारला जोडणे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयीन पातळीवर लढाई सुरू असताना ममता बॅनर्जी यांनी थेट केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

Web Title: kolkata news Mobile number will not link to aadhar: Mamta Banerjee