चीनपासून स्वातंत्र्य नको; विकासाची मात्र अपेक्षा

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

दलाई लामा यांची भूमिका; भविष्याकडे पाहणे आवश्‍यक

कोलकता: तिबेटला चीनपासून स्वातंत्र्य नको आहे, मात्र अधिक विकासाची अपेक्षा आहे, अशी भूमिका तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी आज मांडली. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात ते बोलत होते.

"चीन आणि तिबेटमध्ये कधीतरी वाद होत असला तरी त्यांच्यात जवळचे नाते आहे. भूतकाळ विसरून आता आपण भविष्यकाळाकडे पाहायला हवे. आम्हाला चीनपासून वेगळे व्हायचे नाही, त्यांच्याबरोबरच राहायचे आहे. मात्र, आम्हाला अधिक विकास हवा आहे,' असे दलाई लामा म्हणाले. चीनने तिबेटी संस्कृती आणि वारश्‍याचा आदर करायला हवा, असे मतही त्यांनी मांडले. तिबेटी लोकांची संस्कृती वेगळी आहे, लिपीही वेगळी आहे. चिनी नागरिकांना त्यांचा देश आवडतो, आम्हाला आमचा देश आवडतो, असे ते म्हणाले. तिबेटचे पठार हा पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने तिसरा ध्रुव असून, या भागातून सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत अनेक नद्यांचा उगम होतो. त्यामुळे तिबेटच्या पठाराचे रक्षण करणे, हे केवळ तिबेटच्या दृष्टीने नव्हे; तर कोट्यवधी लोकांच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्‍यक आहे, असेही दलाई लामा म्हणाले.

Web Title: kolkata news there is no freedom from China say dalai lama