इशरतला नोकरीसाठी केंद्राला विनंती करणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

भाजप महिला मोर्चाच्या नेत्याचे प्रतिपादन

कोलकता: मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या प्रथेविरोधात आवाज उठवून न्यायालयात दाद मागणाऱ्या याचिकाकर्त्या इशरत जहॉं यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. इशरत जहॉं यांना उदरनिर्वाहासाठी नोकरी देण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे पश्‍चिम बंगालमधील भाजप महिला मोर्चाच्या नेत्या लोकेत चॅटर्जी यांनी सांगितले.

तोंडी तलाकला गुन्हेगारी कृत्य ठरविणारे विधेयक केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात लोकसभेत मंजूर केले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी इशरत जहॉं यांनी भाजपची वाट धरली. त्या हावडा येथील रहिवासी आहेत. शनिवारी (ता.30) त्या भाजपच्या कार्यालयात आल्या होत्या. तेथे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षाच्या कोलकता येथील प्रदेश कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. चॅटर्जी म्हणाल्या, "" इशरत या सध्या आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांना एक वेळची मदत करून भागणार नाही, तर त्यांना व त्यांच्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी नियमित उत्पन्न मिळणे आवश्‍यक आहे.

लोकसभेत तोंडी तलाकविरोधातील विधेयक मंजूर केल्याबद्दल इशरत जहॉं यांनी मोदी सरकारचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, तोंडी तलाकविरोधातील विधेयक मंजूर करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करते. यानंतर आता आमच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य तरी सुरक्षित राहिल. आम्ही ज्या अनुभवातून गेलो, त्यातून त्यांना जावे लागणार नाही. भाजप राजकीय पक्ष आहे म्हणून नाही तर त्यांनी आमच्या व्यथा जाणून आम्हाला पाठिंबा दिला, म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: kolkata news triple talaq petitioner Ishrat Jahan joins BJP and job