#MamataVsCBI : छापा टाकायला गेलेल्या अधिकाऱ्यांनाच पोलिसांनी केली अटक

#MamataVsCBI : छापा टाकायला गेलेल्या अधिकाऱ्यांनाच पोलिसांनी केली अटक

कोलकाता: कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आणखी चिघळणार आहे.

कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महापौर फिरहाद हकीम दाखल झाले असून चर्चा सुरु आहे. कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या कार्यालयाला वेढा घातला असून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला वाद आणखी चिघळणार हे स्पष्ट आहे. शारदा चिट फंड गैरव्यवहाराची चौकशी करताना केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये जोरदार संघर्ष पेटलेला पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपने पश्चिम बंगालमध्ये सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, भाजपाच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास राज्य सरकारने पोलिस प्रशासनाला पुढे करून नकार दिला आहे. हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच आंध्र प्रदेश सरकारसह प. बंगालमध्ये परवानगीशिवाय सीबीआय अधिकाऱ्यांना छापेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. अमित शहा यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास मनाई केल्यानंतर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही परवानगी नाकारण्यात आली. शेवटी योगी यांनी फोनवरून भाषण द्यावे लागले.


सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी नेले...
सीबीआय ही केंद्र सरकारच्या अखत्यारितील तपास यंत्रणा आहे. दिल्लीत तपास करण्यासाठी किंवा छापे मारण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते. मात्र, अन्य राज्यांमध्ये तपास करण्यासाठी 'सर्वसाधारण सहमती' आवश्यक असते. राज्यांनी काही दशकांपूर्वी ही संमती दिली होती. मात्र, केंद्र सरकारकडून सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या अधिकारातील राज्यांमध्ये सीबीआयला दिलेले पत्र मागे घेतले आहे. यामुळे प. बंगालमध्ये कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी छापा मारण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com