महिला कर्मचारी मारहाणप्रकरणी कोट्टूर सक्तीच्या रजेवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

बेळगाव - महापालिकेच्या जन्म - मृत्यू दाखले विभागातील महिला कर्मचारी संगीता गुडीमनी यांना मारहाण केल्याप्रकरणी पालिकेतीलच प्रथम दर्जा सहाय्यक विजय कोट्टूर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झाला.

बेळगाव - महापालिकेच्या जन्म - मृत्यू दाखले विभागातील महिला कर्मचारी संगीता गुडीमनी यांना मारहाण केल्याप्रकरणी पालिकेतीलच प्रथम दर्जा सहाय्यक विजय कोट्टूर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झाला. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांनी हा निर्णय घेतला. 'सकाळ'ने या विषयचा सातत्याने पाठपुरावा केला होता.

माजी महापौर किरण सायनाक यांनी हा विषय उपस्थित केला. कर्मचारी संगीता गुडीमनी यांना मारहाण केलेल्या विजय कोट्टूर यांची वैद्यकीय तपासणी केली का? असा सवाल त्यांनी केला. महापालिकेत काही कर्मचारी मद्यप्राशन करून येतात, त्यांची तपासणी करण्यासाठी महापालिका कार्यालयात ब्रीद अॅनालायजर बसवा, अशी मागणी सायनाक यांनी केली.

माजी महापौर सरीता पाटील यांनीही महिला कर्मचारी महापालिकेत सुरक्षित नसल्याचा आरोप केला. मारहाण प्रकरणातील संशयीत कर्मचार्याबाबत याआधी काही तक्रार आहे का? अशी विचारणा पंढरी परब यांनी केली. संबंधित घटनेची चौकशी करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याचे प्रशासन उपायुक्त डाॅ. शशीधर नाडगौडा यांनी सांगितले.

या विषयावर सर्व नगरसेविकानी संबंधित कर्मचार्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली. त्या कर्मचार्यांची वैद्यकीय तपासणी का झाली नाही? असा सवाल सरला हेरेकर यानी केला. संबंधित कर्मचार्यावर कारवाईचा अधिकार नाही नगरप्रशासन खाते त्याबाबत निर्णय घेईल, असे स्पष्टीकरण आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिले. सरकारचा आदेश येईपर्यंत संबंधित कर्मचार्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांनी दिला. महापौरांच्या या निर्णयाचे नगरसेविकानी स्वागत केले.

Web Title: Kottur forced leave on female employee assault