कुलभूषण जाधव जिवंत : अब्दुल बासित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

जाधव यांच्या आईने दाखल केलेली याचिका भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी कार्यवाहीसाठी परराष्ट्र सचिव तेहमिना झांझुआ यांच्याकडे पाठविली आहे, असेही त्यांनी सांगितले.

जम्मू : कथित हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव जिवंत असल्याची माहिती पाकिस्तानचे भारतासाठीचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी आज दिली.

'मी याबाबतची हमी देतो की ते जिवंत आहेत', असे बासित यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. जाधव यांच्या आईने दाखल केलेली याचिका भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी कार्यवाहीसाठी परराष्ट्र सचिव तेहमिना झांझुआ यांच्याकडे पाठविली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या सैनिकांनी दोन भारतीय जवानांचे शिरकाण केल्याचा आरोपही बासित यांनी फेटाळला. आमचे सैनिक अशा प्रकारची कृत्ये करत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Web Title: kulbhushan jadhav is alive, says pakistani high commissioner basit