देशासाठी काहीही... आम्ही भारतीय जगात भारी!

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी भारताच्या बाजूने निकाल दिला. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीयांचे देशावर किती प्रेम आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश पाकिस्तानला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. मात्र निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने भारताविरोधात लढण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. 

पाकिस्तानची बाजू मांडणारे अधिवक्ता खावर कुरेशींनी कुलभूषण प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडण्यासाठी 20 कोटी रुपये घेतले. मात्र इतके पैसे घेऊन देखील पाकिस्तानच्या विरोधात निकाल देण्यात आला आहे.  पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात देखील या खर्चाचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये राहणारे अधिवक्ते खावर कुरेशींना या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी 20 कोटी दिले असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. 

भारताच्या बाजूने हरिश साळवेंनी युक्तिवाद केला आहे. हरिश साळवेंनी भारताची बाजू अगदी प्रखरपणे मांडली. परिणामी 16 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 15-1 असा निकाल देत भारताला मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हरिश साळवे पुन्हा एकदा चर्चेत आले. हरिश साळवे हे एक मोठे वकील असून एका दिवसासाठी 25 ते 30 लाख रुपये फी आकारतात. मात्र कुलभूषण प्रकरणात भारताची बाजू मांडण्यासाठी केवळ 1 रुपया घेतला. तत्कालीन परराष्ट्र मंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांनी स्वतः याची माहिती घेतली होती. 

सलमान खान प्रकरणात महत्त्वाची भूमिका:
हिट अँड रन प्रकरणी 2015 मध्ये सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सलमानची  आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. मात्र  साळवे यांनी न्यायालयात सलमानची बाजू मांडली त्यानंतर सलमानला जामीन मिळाला. सावळेंनी याबरोबरच व्होडाफोन कर प्रकरण, रिलायन्स गॅस वाद अशा खटल्यांमध्ये युक्तिवाद केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kulbhushan Jadhav case: India spent Re 1, Pakistan crores on lawyers