Kulbhushan Jadhav : सुषमा स्वराज यांनी केले 'आयसीजे'च्या निकालाचे स्वागत

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

- कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने मिळवला 15/1 मतांनी विजय.

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजूने निकाल लागला. या निकालानंतर माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्याप्रमाणे लढाई दिली, ती आजच्या निकालात महत्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निकालाचे मन:पूर्वक स्वागत, असे सुषमा स्वराज यांनी ट्विट करून सांगितले. 

कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने 15/1 अशा मतांनी विजय मिळवला. कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचा आदेश आयसीजेने दिला असून, कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. या निकालानंतर सुषमा स्वराज यांनी भारताचे वकील हरिश साळवे यांचेही आभार मानले आहेत. आपण अतिशय प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडली. याप्रकरणात भारताला विजय मिळाल्याचे म्हटले.

तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे कुलभूषण यांचे कुटुंब नक्कीच आनंदी असेल, असेही स्वराज यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kulbhushan Jadhav Case Result we are welcome ICJ results says Sushma Swaraj