कुलभूषण जाधव प्रकरणी न्यायालयात याचिका

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचे केंद्राला निर्देश द्या

नवी दिल्ली: माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाशी संपर्क साधण्यासंदर्भात केंद्राला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका आज एका सामाजिक कार्यकर्त्याने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केली आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

परराष्ट्र मंत्रालय आणि गृहमंत्रालयास जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला संपर्क साधण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे. पाकिस्तानने जाधव यांना बेकायदा ताब्यात ठेवले असून, त्यांना चुकीच्या आधारावर फाशीची शिक्षा सुनावली आहे. याचिकाकर्ते राहुल शर्मा यांनी म्हटले की, पाकिस्तानचे सैन्य जाधव यांना निष्पक्ष सुनावणीची संधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाने 10 एप्रिलला जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबाबत पुष्टी दिली होती. 46 वर्षीय जाधव यांना पाकिस्तानच्या सैनिक न्यायालयाने हेर असल्याचे दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: Kulbhushan Jadhav: filed a case in court