Kulbhushan Jadhav : हरिश साळवे यांनी खटल्यासाठी घेतले 'इतके' रुपये

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला. याप्रकरणी वरिष्ठ वकील हरिश साळवेंनी भारताची बाजू मांडली. 

हेग : पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला. याप्रकरणी वरिष्ठ वकील हरिश साळवेंनी भारताची बाजू मांडली. 

न्यायालयात हरिश साळवेंनी केलेला युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच 16 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 15-1 असा निकाल दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हरिश साळवे पुन्हा एकदा चर्चेत आले. देशातील प्रख्यात वकिलांपैकी एक असलेल्या साळवेंची एक दिवसाची फी 25-30 लाख रुपये असल्याचे बोलले जाते.

मात्र, त्यांनी कुलभूषण प्रकरणात भारताची बाजू मांडण्यासाठी केवळ एक रुपया घेतला. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना त्यांना ट्विटरवर एकाने याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी स्वराज यांनी साळवे घेत असलेल्या फीची माहिती दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kulbhushan Jadhav gets Fees of Rupee one Information Received