कुमारस्वामी 'काला' चित्रपटाला सुरक्षा द्या : रजनीकांत

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

कावेरी नदीच्या पाणीवाटपा बद्दल रजनीकांत यांनी वक्तव्य केलेला हा चित्रपट गुरूवारी 7 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटकातील एका गटाने विरोध करून चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी दिली आहे. मात्र, या प्रकरणी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शनाला परवाणी देऊन चित्रपटगृहांना संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी राज्य सरकारने चित्रपटाच्या सुरक्षाविषयी न्यायालयाला आश्वासन दिले आहे. 

बंगळूर : अभिनेता-राजकारणी रजनीकांत यांच्या आगामी 'काला'या चित्रपटाला कन्नड कार्यकर्त्यांकडून मोठा विरोध होत आहे. यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काला चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहांना संरक्षण देण्याची मागणी रजनीकांत यांनी केली आहे.

कावेरी नदीच्या पाणीवाटपा बद्दल रजनीकांत यांनी वक्तव्य केलेला हा चित्रपट गुरूवारी 7 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटकातील एका गटाने विरोध करून चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी दिली आहे. मात्र, या प्रकरणी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शनाला परवाणी देऊन चित्रपटगृहांना संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी राज्य सरकारने चित्रपटाच्या सुरक्षाविषयी न्यायालयाला आश्वासन दिले आहे. 

रजनीकांत म्हणाले, "मला एच. डी कुमारस्वामी यांची परिस्थिती समजते. पण हे कर्नाटकसाठी चांगले नाही. जेव्हा हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होईल, तेव्हा कर्नाटक बंदीमुळे या विषयावर प्रकाश टाकला जाईल. कन्नड भाषीक राज्यात चित्रपटांना आवाहन करण्यात येत आहे. वितरकांकडून कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची खात्री फिल्म चेंबर्सची असते. कर्नाटक फिल्म चेंबरची काला चित्रपटावर बंदीची मागणी योग्य नाही." 

कावेरी प्रश्न सुटल्यावर प्रदर्शित करण्याचा सल्ला
"राज्याचा प्रमुख म्हणून न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावनी करणे माझी जबाबदारी आहे. पण व्यक्तीशा माझे निरिक्षण असे आहे की, चित्रपटाचे निर्माते आणि वितरक यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. हा सल्ला एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक कन्नाडी माणूस म्हणून आहे. मी स्वतः एक निर्माता आणि वितरक राहिलो आहे. ही वेळ आर्थिकदृष्ट्या निर्मात्यांसाठी योग्य नाही. त्यामुळे कावेरी पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर कधीही चित्रपट प्रदर्शित करावा." अशी भूमिका मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी घेतली आहे.

न्यायालयाने आदेश देऊनही कुमारस्वामींनी केलेल्या विधानांमुळे रजनीकांता नाखुश झाले आहेत. तसेच कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (केएफसीसी) चित्रपट प्रदर्शनाला परवाणगी नाकारली आहे.

Web Title: Kumaraswamy provide protection for 'Kala' movie: Rajinikanth