माझ्यावर काँग्रेसचीच कृपा - कुमारस्वामी 

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

कर्नाटकमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मात्र विरोधी पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडून शेतकरी कर्जमाफीसाठी दबाव वाढत आहे. यावर एच. डी. कुमारस्वामी यांनी एक रोखठोक विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी जनतेच्या दबावाखाली नसून, काँग्रेसच्या कृपेवर अवलंबून आहे.  परंतु, शेतकरी कर्जमाफी देण्यास माझे प्राधान्य असेल. ती देण्यास अपयशी ठरलो तर, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बंगळूर - कर्नाटकमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मात्र विरोधी पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडून शेतकरी कर्जमाफीसाठी दबाव वाढत आहे. यावर एच. डी. कुमारस्वामी यांनी एक रोखठोक विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी जनतेच्या दबावाखाली नसून, काँग्रेसच्या कृपेवर अवलंबून आहे.  परंतु, शेतकरी कर्जमाफी देण्यास माझे प्राधान्य असेल. ती देण्यास अपयशी ठरलो तर, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकरी कर्जमाफीसाठी दबाव आणणाऱ्या भाजप आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांसाठी मी त्यांच्यासोबतही काम करेल. त्यासाठी कोणी माझा राजीनामा मागण्याची गरज नाही. मी त्यासाठी असमर्थ ठरलो तर मीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल. अजुन मंत्रीमंडळही स्थापन झालं नाही, तोपर्यंतही तुम्ही वाट पाहू शकत नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

माझ्या पक्षाने स्वबळावर सरकार स्थापन केलेले नाही. राज्यातील साडेसहा कोटी जनतेच्या जीवावर नाहीतर, आमचे सरकार काँग्रेसच्या कृपेवर अवलंबून आहे हे विसरुन चालणार नाही. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kumaraswamy says i am at mercy of congress