निर्मात्यांनी 'काला' कर्नाटकात प्रदर्शित करु नये : कुमारस्वामी 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

''सरकार म्हणून आम्ही आवश्यक ती पावले उचलणार आहोत. काही संघटना याचा विरोध करत आहेत. कारण काही परिस्थिती आणि त्यांनी चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी पावले उचलली आहेत. जर त्यांना वाटले तर त्यांच्याकडून चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो''.

- कुमारस्वामी, मुख्यमंत्री, कर्नाटक

बंगळुरु : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'काला' चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित करण्याबाबत अडचणी येत आहेत. असे असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी रजनीकांत यांचा काला चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित करू नये, असे निर्मात्यांना सांगितले. 

कुमारस्वामी यांनी चित्रपट निर्माते यांना सांगितले, की कर्नाटकात काला प्रदर्शित करण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारकडून काला चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान सुरक्षा पुरविण्याचे सांगितल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. कुमारस्वामी यांनी सांगितले, की उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यावर माझे वैयक्तिक मत आहे, की कन्नाडिगा येथे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती परिस्थिती विरोधकांमुळे निर्माण झाली आहे. जर त्यांनी चित्रपट प्रदर्शित करू नये, असे केल्यास ते एक आदर्श असे आहे.

''सरकार म्हणून आम्ही आवश्यक ती पावले उचलणार आहोत. काही संघटना याचा विरोध करत आहेत. कारण काही परिस्थिती आणि त्यांनी चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी पावले उचलली आहेत. जर त्यांना वाटले तर त्यांच्याकडून चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो'', असेही कुमारस्वामी म्हणाले. 

Web Title: Kumaraswamy says makers of Rajinikanth Kaala should avoid releasing movie in Karnataka