काँग्रेस हायकमांडसोबत कुमारस्वामी यांची दिल्लीत आज भेट

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

जनता दल (एस)चे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी आज दिल्लीत पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा होईल. राहुल आणि सोनिया यांच्या भेटीनंतर कुमारस्वामी हे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची भेट घेणार आहेत.

नवी दिल्ली - जनता दल (एस)चे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी आज दिल्लीत पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा होईल. राहुल आणि सोनिया यांच्या भेटीनंतर कुमारस्वामी हे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची भेट घेणार आहेत.

कर्नाटक प्रदेश काँग्रेसने मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंपदाची मागणी केली आहे. एक लिंगायत समाजासाठी तर एक दलित समाजासाठी हे पद असायला हवे. परंतु, ही मागणी जनता दल (एस)ने नाकारली आहे.  

काँग्रेसमध्ये डी.के.शिवकुमार आणि एम.बी.पाटील हे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. परंतु, हायकमांड घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे डी.के.शिवकुमार यांनी स्पष्ट केले.मतमोजणीच्या दिवशी काँग्रेस आणि जनता दल (एस)मध्ये झालेल्या करारानुसार कुमारस्वामी हे मुख्यमंत्री होणार असून, उपमुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर हे देखील उत्सुक आहेत.

कुमारस्वामींच्या जनता दल (एस)च्या तुलनेत काँग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्याने सत्तेतसुद्धा त्यांच्यापेक्षा मोठा वाटा मिळायला हवा, अशी कर्नाटक प्रदेश काँग्रेसची अपेक्षा आहे.   
 

Web Title: Kumaraswamy's Meet With Gandhis Amid Tussle Over Number 2 Post