केरळमधील कुंबलांगी ठरले भारतातील पहिले सॅनेटरी पॅडमुक्त गाव First Sanitary Napkin Free Village | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

menstrual cup
केरळमधील कुंबलांगी ठरले भारतातील पहिले सॅनेटरी पॅडमुक्त गाव First Sanitary Napkin Free Village

केरळमधील कुंबलांगी ठरले भारतातील पहिले सॅनेटरी पॅडमुक्त गाव

एर्नाकुलम, केरळमधील (Keral) कुंबलांगी हे भारतातील पहिले सॅनेटरी पॅडमुक्त गाव ठरले आहे. एर्नाकुलम मतदारसंघात सुरू असलेल्या एका अनोख्या मोहिमेचा हा एक भाग आहे. गुरुवारी, १३ जानेवारी रोजी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान याविषयी घोषणा करणार होते .

या उपक्रमाचा एक भाग म्हणून १८ आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना मासिक पाळीच्या कपचे (menstrual cup) वाटप केले जाणार आहे. एकूण 5000 मासिक पाळीच्या कपचे वाटप केले जाणार आहे.

हेही वाचा: काडेपेटीत मावणारी साडी पाहिलीत का? किंमत जाणून अवाक व्हाल

एर्नाकुलम संसदीय मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या 'अवलकायी' (तिच्यासाठी) योजनेचा भाग म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे, असे खासदार हिबी एडन यांनी सांगितले. या योजनेत एचएलएल मॅनेजमेंट अकादमी त्यांच्या 'थिंगल' योजनेद्वारे आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हे भागीदार आहेत.

हेही वाचा: लसीकरणानंतर मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते: संशोधनाचा निष्कर्ष

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top