कुंभमेळाव्यात मोदींविरोधात पोस्टर; भाजपची उडाली झोप

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जानेवारी 2019

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींना पुढे करत नागरिकांमध्ये पुन्हा आशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कुंभमेळाव्यात लावण्यात आलेल्या पोस्टर्स वरून भाजपला धक्का बसला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदींनी लक्ष्य करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी नुकतेच राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असून, अध्यादेश काढला जाणार नसल्याचे म्हटले होते.

याच प्रकरणी प्रयागराज येथे पोस्टर लावण्यात आले असून, त्यावर स्पष्ट लिहिले आहे की जन्मभूमी पर अगर, नही राम का अधिकार, राम तेरे देश मे, हिंदू होने पर धिक्कार. राम मंदिरावरून संतांमध्ये नाराजी आहे. कुंभमेळाव्यात सहभागी झालेल्या लाखो नागरिकांचे लक्ष या पोस्टरकडे जात असून, चर्चांना उधाण आले आहे. स्वामी नरेंद्राचार्य यांचे या पोस्टरवर छायाचित्र आहे. राम मंदिराशी संबधिक विविध आशयाचे पोस्टर्स प्रयागराजमध्ये दिसत आहेत.

Web Title: kumbh mela 2019 hoarding in prayagraj for construction ram mandir in ayodhya