मोदीजी, गंगा स्नानाने पाप धुतले जात नाहीः मायावती

वृत्तसंस्था
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

लखनौः गंगा स्नान केल्यामुळे पाप धुतले जात नाही, असा टोला बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीटरवरून लगावला आहे.

मायावती म्हणाल्या, 'मोदी सरकारने जनतेला दिलेल्या खोट्या आश्वासनांचे पाप शाही स्नानामुळे धुतले जाणार नाही. जीएसटी आणि नोटबंदीचा मार सहन करणारी जनता इतक्या सहजपणे सरकारला माफ करणार नाही. निवडणुकीच्यावेळी शाही स्नान केल्याने मोदी सरकारचे खोटे आश्वासन, जनतेचा विश्वासघात आणि सरकारकडून होत असलेला अन्याय-अत्याचाराचे पाप धुतले जातील का?'

नोटबंदी, जीएसटी, द्वेष आणि सांप्रदायिकता आदींचा जबरदस्त त्रास सहन करत असलेले लोक भाजपला इतक्या सहजपणे माफ करतील का, असा सवालही मायावती यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मोदी यांनी कुंभमेळ्यात स्नान करण्यावर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुण्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. मायावतींपासून ते अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राज बब्बर यांनी मोदींची ही निवडणुकीसाठीची चाल असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावरही मोदींवर टीका करणारी व्यंगचित्रे व्हायरल होत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kumbh Shahi Snan Wont Help Wash Off Sins, Mayawati Takes A Dig At PM Modi