मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दोन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा; AK-47 रायफल्स, दोन पिस्तूल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kupwara 2 Terrorist Killed in Army Encounter

जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दोन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा; AK-47 रायफल्स, दोन पिस्तूल जप्त

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) मोठी बातमी समोर येत आहे. सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय. भारतीय लष्कर (Indian Army) आणि स्थानिक पोलिसांनी नियंत्रण रेषेजवळ दोन कुख्यात दहशतवाद्यांना (Terrorists) कंठस्नान घातलं आहे. त्यांच्याकडून दोन AK-47 रायफल, दोन पिस्तूल आणि 4 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीची ही घटना कुपवाडामधील नियंत्रण रेषेजवळील माछिल भागातील आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून दोन AK-47 रायफल, दोन पिस्तूल आणि 4 बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. नियंत्रण रेषेजवळील सीमेपलीकडून आलेले दहशतवादी भारतात घुसण्याचा नापाक प्रयत्न करत आहेत. याशिवाय, स्थानिक दहशतवादीही या भागात दिसत आहेत.

हेही वाचा: Iran Hijab Row : 'हिजाब'विरोधात इराणी महिला आक्रमक; 700 जणींना अटक, 41 लोकांचा मृत्यू

कुपवाडामध्ये (Kupwara) चकमकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या वर्षी जूनमध्ये कुपवाड्यातील चकतारस कंडी भागात दहशतवाद्यांसोबत पोलीस आणि लष्करात चकमक झाली होती. या चकमकीत लष्कर-ए-तौयबा या दहशतवादी संघटनेचे 2 दहशतवादी मारले गेले. त्यापैकी एकाची ओळख पाकिस्तानी दहशतवादी तुफैल अशी आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.