लडाखमध्ये उणे ४० अंशांतही भाजीपाला पिकतोय

पीटीआय
Sunday, 13 September 2020

१९६२ मध्ये लडाखमध्ये केवळ चार भाज्यांची लागवड केली जात होती, आता येथील शेतकरी सुमारे २५ भाज्या घेत आहेत. लेहच्या डीआरडीओच्या प्रयोगशाळेत ७८ भाज्यांवर काम केले जात आहे. विशेष म्हणजे दिल्लीतही घेतल्या जात नाहीत, एवढ्या भाज्या आता लडाखमध्ये घेतल्या जात आहेत.  जवानांसाठी उणे ४० अंशात भाज्या पिकवल्या जात आहेत

लेह - १९६२ मध्ये लडाखमध्ये केवळ चार भाज्यांची लागवड केली जात होती, आता येथील शेतकरी सुमारे २५ भाज्या घेत आहेत. लेहच्या डीआरडीओच्या प्रयोगशाळेत ७८ भाज्यांवर काम केले जात आहे. विशेष म्हणजे दिल्लीतही घेतल्या जात नाहीत, एवढ्या भाज्या आता लडाखमध्ये घेतल्या जात आहेत.  जवानांसाठी उणे ४० अंशात भाज्या पिकवल्या जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील महिन्यात लडाखला देशांशी जोडणारे दोन्ही रस्ते बंद होणार आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम फळ भाजीपाल्यांच्या पुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत या भागात गरजा भागवण्यासाठी हवाई सेवेचा आधार घ्यावा लागेल. मात्र लेहमधील डीआरडीओच्या संशोधकांनी लडाखमधील शेतकरी आणि जवानांना प्रशिक्षण दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना लडाखमध्ये तापमान उणे ३० ते ४० अंश असतानाही भाजीपाला घेणे शक्य होत आहे. हिमवृष्टीमुळे रस्ते बंद झाले तरी गलवान, प्यॉंगयॉंग, डेमचोक, दौलत बेग ओल्डी यासारख्या भागात भाजीपाल्याची टंचाई जाणवणार नाही. 

सीमाभागात २०० खंदक ग्रीन हाउस

  • ११ हजार फूट उंचीवर विशेष संशोधन संस्था
  • १०१ भाज्या एका हंगामात घेतल्याचा विक्रम
  • ५० टक्के लडाखमधील जवानांना ताजी फळे उपलब्ध
  • २५ लाख दरवर्षी प्रयोगशाळेतून भाजीपाल्याच्या रोपट्यांचे लडाखमध्ये वाटप
  • ३.५ मेट्रिक टन फळे या माध्यमातून गतवर्षी जवानांपर्यंत पोचली

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ladakh vegetables are grown at minus 40 degrees