शिर्डीत साई भक्तांना मिळणार 'लाडू' चा प्रसाद

मागणी पूर्ण झाल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Saibaba
SaibabaEsakal

शिर्डी : शिर्डीतील साई संस्थानचे (Saibaba Temple Shirdi) प्रसादाचे लाडू (Ladoo Prasad Sale Start In Shirdi Temple) विक्री केंद्र भक्तांसाठी जवळपास 7 महिन्यांनतर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. 25 रुपयांत तीन लाडूंचे पॅकेट मिळणार असून दर्शनानंतर देण्यात येणाऱ्या मोफत लाडूचा प्रसाद भक्तांना देण्यास अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.

Saibaba
तिरूपतीला भक्ताकडून सोन्याचे पंजे, किंमत ऐकून बसेल धक्का

विकत देण्यात येणाऱ्या लाडू प्रसादाच्या पाकिटांची सध्या फक्त मंदिराच्या आतील परिसरातच विक्री केली जाणार आहे. तसेच, भाविकांना प्रसादाचे वाटप करताना कोराना नियमांचे पालन (Covid Protocol) केले जाणार असून, प्रसादासाठी काउंटरवर कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याचीदेखील काळजी घेतली जाणार आहे, असे मंदीर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून विकत आणि मोफत लाडूच्या प्रसादाचे वाटप प्रशासनाकडून बंद करण्यात आले होते.

करोनाच्या काळात एप्रिलपासून प्रसादाचे केंद्र बंद होते. लाडू विक्री केंद्र बंद असल्याने व्यावसायिकांनी आपल्या दुकानात थेट लाडू विक्री सुरू केली होती. दुकानदारांकडून भाविकांना वाढीव दरात लाडूची विक्री केली जात असल्याने भाविकांमध्ये नाराजी होती.साई संस्थानने लाडू-प्रसाद पुन्हा सुरू करावा, अशी भाविकांची मागणी होती.अखेर साई भक्तांची मागणी पूर्ण झाल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com