वेश्याव्यवसायप्रकरणी महिला दलालला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

पणजी : वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरविण्याचे काम पुरुष करायचे मात्र या व्यवसायात आता महिला दलालही सरसावल्या आहेत. काल मध्यरात्रीच्या सुमारास कांपाल येथे वेश्या व्यवसायासाठी तरुणीला घेऊन आलेल्या महिला दलाला पणजी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने केली.

काल रात्री दहा वाजल्यापासून पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र संशयित महिला दलाल पोलिसांना गुंगारा देत होती. रात्री दिडच्या सुमारास ती तरुणीला वेश्या व्यवसायासाठी ग्राहकाला देण्यासाठी आली असता तिला ताब्यात घेण्यात आले. पीडित तरुणी ही मुंबईतील असून तिची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. संशयित महिला दलाल ही नागालँडची आहे. समाजसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडित तरुणीची जबानी नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: a lady arrested for prostitution racket