esakal | Lakhimpur incident: हिंदू विरुद्ध शीख असे स्वरूप नको : वरुण गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू विरुद्ध शीख असे स्वरूप नको : वरुण गांधी

हिंदू विरुद्ध शीख असे स्वरूप नको : वरुण गांधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी या घटनेला ‘हिंदू विरुद्ध शीख’ असे स्वरूप देण्याचे प्रयत्न होत असून जनतेने यापासून सावध रहावे, असे आवाहन भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी आज ट्विटरद्वारे केले. हा अत्यंत धोकादायक मार्ग असून त्यातून बाहेर येण्यासाठी अनेक पिढ्या जाव्या लागतील, असेही ते म्हणाले.

वरुण गांधी हे लखीमपूर घटनेपासून भाजपला वारंवार ‘घरचा आहेर’ देत आहेत. ‘स्थानिक नेत्यांच्या अहंकारापोटी गरीब शेतकऱ्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा धर्माशी काहीही संबंध नाही. मात्र, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘खलिस्तानी’ असे वारंवार संबोधले जात असून ते अत्यंत धोक्याचे ठरू शकते.

हेही वाचा: काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

लखीमपूरच्या घटनेला ‘हिंदू विरुद्ध शीख’ असे असे स्वरूप देण्याचा प्रयत्न अनैतिक आहे. राष्ट्रीय एकतेपेक्षा स्वार्थी राजकारणाला महत्त्व दिले जाऊ नये,’ असे वरुण गांधी यांनी ट्विट केले आहे.

लखीमपूरची घटना ही दुर्दैवी होती. हा साधा गुन्हा नव्हता, तर लोकशाही मार्गाने केल्या जाणाऱ्या विरोधाबाबत असलेल्या आकसातून हल्ला करण्यात आला होता.

- सलमान खुर्शीद, काँग्रेस नेते

loading image
go to top