भाजपच्या अडचणी वाढणार? लखीमपूरमध्ये शेतकरी पुन्हा एल्गार पुकारणार

लखीमपुर प्रकरणातील आरोपी केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर कारवाईची मागणी आंदोलक करणार आहेत.
Lakhimpur Kheri
Lakhimpur KheriTeam eSakal

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) निवडणुकांचे बिगुल वाजताच संयुक्त किसान मोर्चा (SKM) पुन्हा एकदा आंदोलनासाठी सज्ज झाला आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर किसान मोर्चाने महिनाभरापूर्वी आंदोलन मागे घेतलं. मात्र आता 21 जानेवारीपासून उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे भाजपविरोधात (BJP) आंदोलन करणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चाने (Samyukta Kisan Morcha) जाहीर केले आहे. एसकेएमच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ते लोकांना भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत.

Lakhimpur Kheri
मी राजा-महाराजा आहे का? मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरला सुनावलं

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, शेतकरी संघटना त्यांच्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याची मागणी करणार आहेत. यासोबतच लखीमपूर खेरी येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या 8 शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दाही ते उपस्थित करणार आहेत. मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याचा गंभीर आरोप आहे.

Lakhimpur Kheri
अखिलेश यादव यांना व्हर्च्युअल रॅली पडली महाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com