रेल्वेच्या एसी डब्यातून 14 कोटींचे सामान चोरीला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : देशभरातील रेल्वेच्या एसी डब्यातून 2017-18 या वर्षात तब्बल 14 कोटी रुपयांचे सामान चोरीला गेल्याचे समोर आले. चोरीला गेलेल्या सामानांमध्ये चादरी, ब्लँकेट, टॉवेल, बेडरोल आणि उशांच्या खोळीचा समावेश आहे. इतक्या मोठ्या किमतीचे सामान चोरीला गेल्याने रेल्वे प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

रेल्वेतील एसी डब्यातून या सर्व सामानासह शौचालयामधील नळ, मगही चोरीला गेले आहेत. रेल्वेतील हे सामान सुरक्षित राहील, यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सुमारे 21 लाख 72 हजार बेडरोलसह विविध वस्तू चोरीला गेल्या आहेत. तसेच यामध्ये चार लाखांहून अधिक चादरी, 3 लाखांहून अधिक उशांच्या खोळी आणि सुमारे 12 हजार टॉवेल चोरीला गेले आहेत.

दरम्यान, रेल्वेच्या एसी डब्यांतून ही मोठी चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने रेल्वे प्रशासन आता यापुढे काय कारवाई करते, हे पाहणे गरजेचे आहे.

Web Title: Lakhs of towels bedsheets missing from Rails AC coaches