लालूप्रसाद, राबडीदेवींसह चौदा जणांना समन्स 

पीटीआय
मंगळवार, 31 जुलै 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : आयआरसीटी हॉटेल कथित गैरव्यवहारप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री, राजद नेते लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्यासह चौदा आरोपींविरुद्ध पतियाळा हाउस न्यायालयाने समन्स बजावले. विशेष न्यायधीश अरविंद कुमार यांनी चौदा जणांना 31 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सुजाता समूहाला आयआरसीटीसीचे दोन हॉटेल चालवण्यास देण्याच्या प्रक्रियेतील कथित अनियमितता केल्याचा आरोप यादव कुटुंबीयांवर आहे. 

तत्पूर्वी या प्रकरणात आठ जणांचे नाव होते. आता आणखी सहा जणांची नावे जोडली गेली आहेत. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध प्रथमच आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता, सरला गुप्ता, हॉटेल चाणक्‍यचे मालक विजय आणि विनय कोचर आणि आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गोयल यांचा समावेश आहे. तसेच आयआरसीटीसीचे संचालक राकेश सक्‍सेना, जनरल मॅनेजर बी. के. अग्रवाल आणि लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय प्रेम गुप्ता यांचेही नाव आरोपपत्रात आहे. 2004 ते 2009 या काळात लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना निविदा काढण्यातील अनियमितता ते सुजाता समूहाला रेल्वेचे हॉटेल चालवण्यास देण्याच्या प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर हॉटेलशी निगडित जाहिरात आणि निविदा प्रक्रियेतही बदल केल्याचा आरोप केला आहे. लालू यांनी फोनवरून निविदा भरणाऱ्या अन्य व्यक्तींना धमकी दिल्याचाही आरोप आहे. 

Web Title: Lalu Prasad and Rabdi Devi summoned fourteen