लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर 

पीटीआय
रविवार, 20 जानेवारी 2019

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर "इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'च्या (आयआरसीटीसी) गैरव्यवहारप्रकरणी "सीबीआय'ने दाखल केलेल्या खटल्याच दिल्ली न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. 

पशुचारा गैरव्यवहारात लालूप्रलाद शिक्षा भोगत आहेत. उपचारांसाठी ते सध्या रांचीतील "राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या रुग्णालयात दाखल आहेत. विशेष न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी लालूप्रसाद यांना एक लाखाच्या वैयक्तिक जात मुचलका व तेवढीच हमी रक्कम भरण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. या आधी लालूप्रसाद यांना हंगामी जामीन मंजूर करण्यात आला होता. लालूप्रसाद यांची पत्नी राबडीदेवी आणि पुत्र तेजस्वी यादव यांनाही हंगामी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, मनी लॉंडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या प्रकरणात लालूप्रसाद, राबडी देवी व तेजस्वी यादव यांच्या हंगामी जामिनाला न्यायालयाने 28 जानवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 
 
Web Title: Lalu Prasad granted bail