लालूप्रसाद यादव यांना पॅरोल मंजूर ; 5 दिवसांसाठी येणार बाहेर

वृत्तसंस्था
बुधवार, 9 मे 2018

लालूंचे पुत्र आणि बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यांचा 12 मे रोजी विवाह आहे. तेजप्रताप यांच्या विवाहास उपस्थित राहण्यासाठी लालूंनी पॅरोलसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाची दखल घेत लालूंना पॅरोल मंजूर झाला.

पटणा : कोट्यवधींच्या चारा गैरव्यवहारात दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांना त्यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांच्या लग्नासाठी पाच दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. त्यामुळे लालूंना आता मुलाच्या लग्नात सहभागी होता येणार आहे. 

tejaswi yadav

लालूंचे पुत्र आणि बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यांचा 12 मे रोजी विवाह आहे. तेजप्रताप यांच्या विवाहास उपस्थित राहण्यासाठी लालूंनी पॅरोलसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाची दखल घेत लालूंना पॅरोल मंजूर झाला. त्यामुळे मुलाच्या लग्नात सहभागी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच लालूंना 9 मे ते 14 मे या पाच दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्यात यावे, अशी शिफारस कारागृह अधीक्षकांनी केली होती. त्यांच्या पॅरोलवर विचारविनिमय करण्यासाठी त्यांच्या कागदपत्रांची फाइल महाधिवक्त्यांकडे पाठविली होती. त्यानंतर आता त्यांना पाच दिवसांचा पॅरोज मंजूर करण्यात आला आहे. 

दरम्यान, लालूप्रसाद यादव यांना चारा गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर लालूंची रवानगी बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.  

Web Title: Lalu Prasad granted parole Come out from jail for 5 days