समेटासाठी लालूंचा यादव पिता-पुत्रांना फोन

पीटीआय
शनिवार, 31 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

पाटणाः उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षामध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वबूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज (शनिवार) मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधला.

यादव पिता-पुत्रांमधील वाद मिटविण्यासाठी लालूप्रसाद यांनी पुढाकार घेतला आणि उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी भांडण मिटविले पाहिजे, असे लालूप्रसाद यांनी सांगितले. 

'मी दोघांनी सकाळी फोन केला. दोघांशीही सविस्तर बोललो. तुम्हा दोघांमधील वाद होणे म्हणजे विरोधकांना ताकद देण्यासारखे आहे, असे मी त्यांनी सांगितले,' असे लालूप्रसाद यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. 

राजकारणापलिकडे लालूप्रसाद आणि मुलायमसिंह यांच्यात नाते आहे. मुलायम यांचे पणतू आणि मणिपुरीचे खासदार तेज प्रताप यादव यांच्याशी लालूप्रसाद यांच्या कन्येचा विवाह झाला आहे. समाजवादी पक्षाच्या नुकत्याच साजऱया झालेल्या स्थापना दिवस सोहळ्यात लालूप्रसाद सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी अखिलेश आणि समाजवादी पक्षाचे राज्य अध्यक्ष शिवपालसिंह यादव यांच्यात समेटासाठी प्रयत्न केले होते. 

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे लालूप्रसाद यांनी आधीच जाहीर केले आहे. 

Web Title: Lalu Prasad Yadav calls Mulayam, Akhilesh advised to calm down