लालूप्रसाद यादवांना 10,000 निवृत्तिवेतन

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

पाटणा : जेपी सन्मान निवृत्तिवेतनासाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष पात्र ठरल्याची माहिती राज्याच्या गृहमंत्रालयाने दिली. निवृत्तिवेतन मिळावे यासाठी लालूप्रसाद यादव यांनी केलेला अर्ज मंजूर करण्यात आला असून, त्यांना आता महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत.

जयप्रकाश नारायण यांनी 1974 मध्ये "संपूर्ण क्रांती' आंदोलन सुरू केले होते. त्या वेळी विद्यार्थिदशेत असलेले लालूप्रसाद यादव यांनी त्यात सहभाग घेऊन तुरुंगवास भोगला होता. 2015 मध्ये आणलेल्या जेपी सन्मान निवृत्तिवेतन योजनेसाठी लालूप्रसाद यादव हे पात्र ठरले आहेत. या योजनेअंतर्गत ज्यांनी एक ते सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे. त्यांना पाच हजार रुपये तर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिलेले दहा हजार रुपये निवृत्तिवेतनास पात्र ठरविण्यात आले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पहिल्या कार्यकालात 2009 मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण निवृत्तिवेतन योजना आणली. नितीशकुमार स्वत: जयप्रकाश नारायण यांच्या जवळचे होते आणि आंदोलनाच्या काळात त्यांनीसुद्धा तुरुंगवास भोगला होता. या योजनेअंतर्गत सुमारे तीन हजार 100 जणांना याचा लाभ होणार आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांचाही समावेश आहे. वास्तविक नितीशकुमारसुद्धा या निवृत्तिवेतनासाठी पात्र असले तरी त्यांनी ते घेण्यास नकार दिला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

Web Title: lalu prasad yadav to get pension 10000 per month