गाय फक्त दूध देते;मोदींना आता कळले: लालु

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

पाटणा - "गाय ही दूध देते; मात्र मत देत नाही,‘ हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वोच्च नेते लालुप्रसाद यादव यांनी लगावला आहे. 

पाटणा - "गाय ही दूध देते; मात्र मत देत नाही,‘ हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वोच्च नेते लालुप्रसाद यादव यांनी लगावला आहे. 

यादव यांनी याआधी यासंदर्भात एक ट्‌विट केले होते. "गोमाता दूध देते, मत नाही. मात्र यांना असे वाटते की गोमाता मत देते. यांनी कधी गायी पाळल्याच नाहीत; तर यांना तरी काय माहिती असणार?,‘‘ अशी उपरोधिक टीका त्यांनी या ट्‌विटच्या माध्यमामधून केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांसंदर्भात केलेले विधान हा सत्याचा विजय व असत्याचा पराभव असल्याची प्रतिक्रिया यादव यांनी व्यक्‍त केली. "गाय ही मत देत नाही, हे मी याआधी व्यक्‍त केलेले मत आता मोदींना चांगल्या पद्धतीने समजले दिसते,‘ असा वाग्बाण यादव यांनी सोडला आहे. 

बिहारमध्येही भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) गायीसंदर्भात चुकीचा प्रचार करण्यात आला; मात्र बिहारने हा प्रचार फेटाळून लावत धर्मनिरपेक्ष सरकारची निवड केल्याचे मतही यादव यांनी यावेळी व्यक्‍त केले. तेव्हा गोमाता यांचे सरकार बनविणे तर दूर राहिले; याआधीच स्थापन करण्यात आलेल्या सरकारांना धक्‍के देत आहे, असा हल्ला त्यांनी चढविला आहे. 

Web Title: Lalu Prasad Yadav hits back at PM Narendra Modi