लालूंच्या 128 कोटींच्या संपत्तीवर येणार टाच ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

बेहिशेबी मालमत्ता कायद्यानुसार लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसेच या कायद्यांतर्गत त्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षाही मिळू शकते. याशिवाय त्यांची 128 कोटींची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते.  

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या सुमारे 128 कोटींच्या मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या कायद्यांतर्गत आयकर विभागाकडून ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतील दोन घरे आणि पाटणातील बंगला जप्त केला जाणार आहे. याबाबत आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. 

चारा गैरव्यवहारप्रकरणी लालूप्रसाद यादव सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्रिपदावर असताना त्यांच्या नातेवाइकांनी बनावट (शेल) कंपन्यांच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीत ही संपत्ती खरेदी केली होती. बेहिशेबी मालमत्ता कायद्यानुसार याप्रकरणी त्यांना दोषी ठरवता येईल.  तसेच त्यानुसार त्यांच्या 128 कोटींच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता कायद्यानुसार लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसेच या कायद्यांतर्गत त्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षाही मिळू शकते. याशिवाय त्यांची 128 कोटींची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते.  

Web Title: Lalu Prasad Yadav set to lose prime benami properties