लालूप्रसाद यादव यांचा जामीन अर्ज फेटाळला 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

देवघर-दुमका-चाईबासा कोशागार गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची जामीन याचिका आज झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. लालूप्रसाद यांच्या तिन्ही प्रकरणांतील जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे राजद पक्षाला धक्का बसला आहे.

रांची: देवघर-दुमका-चाईबासा कोशागार गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची जामीन याचिका आज झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. लालूप्रसाद यांच्या तिन्ही प्रकरणांतील जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे राजद पक्षाला धक्का बसला आहे.

माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी कोशागार गैरव्यवहारप्रकरणी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. गेल्या शुक्रवारी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय गुरुवारपर्यंत राखून ठेवला होता.

लालूप्रसाद यादव यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या राजदच्या प्रचाराला धक्का बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कारण, स्टारप्रचारक लालूप्रसाद यादव याचां बिरसा मुंडा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे

Web Title: Lalu Prasads bail plea in fodder scam cases rejected