आता लालुंना पुत्रांच्या बंडाची भीती: मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पाटणा - समाजवादी पक्षामधील (सप) अखिलेश व मुलायम सिंह यादव या पितापुत्रांमधील संघर्ष पाहून राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) मुख्य असलेले लालुप्रसाद यादव हे काळजीत पडले असतील, असा टोला भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी आज (मंगळवार) लगावला. अखिलेश यांनी पित्याविरोधात पुकारलेले बंड पाहून आपलेही पुत्र असेच करतील, अशी भीती लालु यांना वाटत असेल, असे मोदी म्हणाले.

"लालु यांचे पुत्र व सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी प्रसाद आणि आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव हेदेखील भविष्यात त्यांच्याविरोधात बंड पुकारतील, अशी भीतीने लालु ग्रस्त झाल्याचे मला वाटते आहे,'' असे मोदी यांनी सांगितले. याचबरोबर, अखिलेश व मुलायम यांच्यामधील वादामध्ये मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नांत लालु यांना स्वत:ला मन:स्ताप झाल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदविले.

"अखिलेश व मुलायम यांच्यामधील वाद तर मिटला नाहीच; मात्र भविष्यात आपले पुत्रही आपल्याविरोधात अशाच प्रकारे बंड करतील, अशी नवीच डोकेदुखी लालु यांच्यासाठी निर्माण झाल्याचे,' मोदी म्हणाले!
लालु यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांचे बासरी वाजवितानाचे एक छायाचित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी त्यांनाही लक्ष्य केले.

"लालु यांच्या पुत्रांनी पित्याच्या छायेमधून बाहेर पडून पक्षाचे नेतृत्व आपल्या हाती घ्यावयास हवे; अन्यथा ते आयुष्यभर बासरीच वाजवत बसतील,'' असे मोदी म्हणाले.

Web Title: Lalu scared of coup by sons, says Modi