बिहारमध्ये 'त्या' भन्साळींना मारहाण झाली असती तर...

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

नवी दिल्ली- जयपूरमध्ये "पद्मावती' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना झालेली मारहाण बिहारमद्ये झाली असती तर बिहारला जंगलराज म्हणून बदनाम केले असते, असे म्हणत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव व त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

संजय लीला भन्साळी यांना झालेल्या मारहाणीच्या मुद्यावरून यादव पिता-पुत्रांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. यादव यांनी म्हटले आहे की, भाजपचे सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये भन्साळी यांना झालेली मारहाण वाईटच आहे. परंतु, बिहारमध्ये ही घटना घडली असती तर बिहारला बदनाम केले असते. परंतु, बॉलिवूडमधील कलाकारांना बिहारमध्ये चित्रीकरणासाठी आमंत्रित करत आहोत. बिहारमध्ये स्वागत असून, तुम्हाला प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

दरम्यान, "पद्मावती' चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखविण्यात येत असल्याच्या निषेधार्थ राजपूत गटाने संजय लिला भन्साळी यांच्या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण थांबविले. त्याचप्रमाणे जयगड किल्ल्यात उभारलेल्या सेटचेही नुकसान केले. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे काम करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतानाच करणी सेनेचे कार्यकर्ते किल्ल्यावर जमले आणि त्यांनी आंदोलन करण्यास सुरवात केली. त्यांच्यातील काही जणांनी सेटचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात दीपिका ही "पद्मावती' आणि रणवीर "अल्लाउद्दीन खिलजी' ची भूमिका करत आहे.

Web Title: lalu yadav and tejaswai yadav on sanjay lila bhanshali