जम्मू काश्मीरमध्ये जवान हुतात्मा; पाककडून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 1 October 2020

आतापर्यंत पाकिस्तान नेहमी भारताला त्रास देत आला आहे. कोणत्याही गोष्टीवरून यूएनमध्ये भारताला विरोध करणे हा पाकिस्तानचा नित्याचा भाग झाला आहे.

 श्रीनगर: आतापर्यंत पाकिस्तान नेहमी भारताला त्रास देत आला आहे. कोणत्याही गोष्टीवरून यूएनमध्ये भारताला विरोध करणे हा पाकिस्तानचा नित्याचा भाग झाला आहे. बुधवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये (Krishna Ghati Sector) पाकिस्तानने गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं. या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. 

बुधवारी रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन (ceasefire violation) करून गोळीबार केल्याने भारतीय सैन्यातील लान्स नाईक कर्नेल सिंग ( Lance Naik Karnail Singh) शहीद झाले आहेत. ही माहिती जम्मूच्या संरक्षण (Jammu and Kashmir) प्रवक्त्याने दिली आहे.

"चमत्कार झाला आणि बाबरी मशिद पडली?"

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. दोन्ही देशातील  राजनैतिक बोलणीतही मागील काही दिवसांपासून बरंच अंतर पडल्याचं दिसलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lance Naik Karnail Singh lost his life in ceasefire violation by Pakistan