Land For Job Scam: लालू प्रसाद यादव, राबडी देवींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर | Land-for-job case Delhi court grants bail to Lalu Prasad Yadav ex-Bihar CM Rabri Devi and other accused | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

File photo of Lalu Prasad Yadav
Land For Job Scam: लालू प्रसाद यादव, राबडी देवींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर

Land For Job Scam: लालू प्रसाद यादव, राबडी देवींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर

नोकरीच्या बदल्यात जमिनी घेतल्याच्या घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव, पत्नी राबडी देवी यांच्यासह त्यांच्या परिवारातल्या काही सदस्यांची चौकशी सुरू होती. मात्र आता सर्व आरोपींना या प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे.

दिल्ली न्यायालयाने माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांची मुलगी-आरजेडी खासदार मीसा भारती आणि इतर आरोपींना जामीन मंजूर केला. सीबीआयने अटक न करता आरोपपत्र दाखल केल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने प्रत्येक आरोपीला 50,000 रुपयांचे वैयक्तिक जामीन बॉण्ड आणि तेवढीच रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले.

लालू प्रसाद यादव यांनी आपल्या रेल्वे मंत्रीपदाच्या काळामध्ये नोकरी देण्याच्या बदल्यात लोकांकडून जमिनी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी १८ मे रोजी लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर याच महिन्यात सीबीआयने राबडी देवी, त्यांची मुलगी आणि खासदार मीसा भारती यांच्या घरी छापेमारी केली. तसंच लालू प्रसाद यादव यांची चौकशीही केली. त्यानंतर लगेचच ईडीच्या पथकाने तेजस्वी यादव, त्यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी करत मालमत्ता जप्त केली.

टॅग्स :Lalu Prasad Yadav