Lalu Prasad Yadav : "माझी नातवंडं, गरोदर सुनेला ईडीने..."; छाप्यानंतर लालू प्रसाद यादव संतापले! | Land for job scam lalu prasad yadav angry on ED and BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav : "माझी नातवंड, गरोदर सुनेला ईडीने..."; छाप्यानंतर लालू प्रसाद यादव संतापले!

Lalu Prasad Yadav : "माझी नातवंडं, गरोदर सुनेला ईडीने..."; छाप्यानंतर लालू प्रसाद यादव संतापले!

जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचा घोटाळा केल्याप्रकरणी बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला. याबाबत आरजेडी प्रमुख आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी भाजप आणि ईडीवर निशाणा साधला आहे.

भाजपा आणि ईडीवर संतापून त्यांनी ट्विट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये यादव म्हणतात,"आम्ही आणीबाणीचा भयानक काळही पाहिला आहे. आम्ही त्यातही लढलो. आज माझ्या मुली, नातवंडं आणि गर्भवती सून यांना भाजप ईडीने निराधार सूडाच्या खटल्यात 15 तास बसायला लावले. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का?"

आपल्या ट्वीटमध्ये ते पुढे म्हणतात, "संघ आणि भाजपाविरुद्ध माझा वैचारिक लढा आहे आणि राहील. मी त्यांच्यापुढे कधीही झुकलो नाही आणि तुमच्या राजकारणापुढे माझ्या कुटुंबातील आणि पक्षातील कोणीही झुकणार नाही."

लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी शुक्रवारी आपला भाऊ तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकल्याबद्दल ईडीवर निशाणा साधला. एका ट्विटमध्ये त्यांनी ईडीच्या छाप्याबद्दल भारतीय जनता पक्षावर (भाजप) टीकाही केली. आचार्य यांनी ट्विट केले की, गरोदर महिला आणि मुलांना त्रास दिल्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला हवी.

अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधत त्यांनी ट्विटरवर लिहिले की, असा अन्याय आम्ही लक्षात ठेवू. सर्व काही लक्षात राहील. त्या लहान मुलांचे काय गुन्हे आहेत? तुम्ही त्यांचा छळ का करत आहात? शुक्रवारी सकाळपासून त्यांचा छळ सुरू झाला. तुम्हाला योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल.

टॅग्स :Lalu Prasad Yadav