राबडी देवीनंतर आता लालू यादव अन् मुलगी मीसा भारती अडचणीत : Lalu Prasad Yadav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Lalu Prasad Yadav

Lalu Prasad Yadav: राबडी देवीनंतर आता लालू यादव अन् मुलगी मीसा भारती अडचणीत

नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याचा कथित घोटाळा प्रकरणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलगी मीसा भारती यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राबडी देवी यांच्यानंतर लालू प्रसाद यादव यांची आज सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे. (Land For Job Scam Lalu Prasad Yadav to appear before CBI today)

लालू प्रसाद सध्या दिल्लीत आहेत. नुकतेच त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. याआधी सोमवारी सीबीआय लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या घरी पोहोचली होती. सीबीआयने राबडी देवी यांची तब्बल ४ तास चौकशी केली.

गुजरातमध्ये तब्बल 425 कोटींचं ड्रग्स जप्त; एटीएस, कोस्टगार्डची संयुक्त कारवाई

राबडी देवी यांच्या निवासस्थानी काल सीबीआयने छापा टाकला. त्यानंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर आता लालू प्रसाद यादव यांनाही सीबीआयने समन्स बजावले असल्याची माहिती समोर आली आहे.

H3N2 variant : कोरोनानंतर कर्नाटकमध्ये नवा संसर्ग! राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याचा कथित घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना सीबीआयने समन्स बजावले आहेत. याबाबत दिल्लीत उद्या सीबीआय त्यांची चौकशी करणार आहे. तसेच त्यांच्यासह इतर 14 जणांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.