
Land for jobs scam : सीबीआयच्या समन्सविरोधात तेजस्वी यादव यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली - बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जमीन खरेदी प्रकरणी चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जारी केलेले तीन समन्स रद्द करण्याचे निर्देश देण्याची मागणी तेजस्वी यांच्याकडून करण्यात आली आहे.
याचिकेत म्हटलं की, CrPC च्या कलम 160 अंतर्गत नोटीस केवळ त्या व्यक्तीला जारी केली जाऊ शकते, जी त्या पोलिस स्टेशनच्या स्थानिक अधिकार क्षेत्रात आहे किंवा लगतच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहे. त्यामुळे CrPC च्या तरतुदींचे विशेषत: CrPC च्या कलम 160 मध्ये नमूद केलेल्या तरतुदींचे घोर उल्लंघन केल्यामुळे बेकायदेशीर नोटिस जारी करण्यात आल्या आहेत. न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी यावर सुनावणी होणार आहे.
याचिकेत पुढे म्हटले आहे की याचिकाकर्ता बिहारच्या पाटणा येथील कायमचा रहिवासी आहे. तत्पूर्वी माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांची कन्या-आरजेडी खासदार मीसा भारती आणि जॉब कथित जमीन घोटाळ्यातील इतर आरोपींना राऊस अव्हेन्यू कोर्टाने बुधवारी नियमित जामीन मंजूर केला आहे.