झोपडपट्टीवासीयांना जमीन हक्क प्रमाणपत्र 

स्मृती सागरिका कानुनगो
बुधवार, 9 मे 2018

भुवनेश्‍वर, ता. 7 : ओडिशातील गंजम जिल्ह्यातील छत्तरपूर येथे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते नुकताच जगातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टी नामकरण प्रकल्पास प्रारंभ झाला. झोपडपट्टीवासीयांनाही कसे सक्षम करता येऊ शकते? याचा आदर्श ओडिशाने देशासमोर ठेवला असल्याचे पटनाईक यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. या वेळी आयोजित कार्यक्रमास "टाटा ट्रस्ट'चे चेअरमन रतन टाटादेखील उपस्थित होते. 

पटनाईक म्हणाले, ""आम्ही देशात इतिहास निर्माण केला आहे, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरिबांना न्याय मिळावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पास टाटा समूहाने पाठिंबा दिला असून, हाच उद्योगसमूह त्याला तांत्रिक साहाय्यदेखील करणार आहे. आजमितीस दोन हजार झोपडपट्टीवासीयांना जमीन हक्क प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.'' या प्रकल्पाचा दहा लाख लोकांना फायदा होणार असून, पुढील वर्षी अडीच हजार झोपडपट्ट्यांमध्ये तो राबविला जाणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांना 300 स्क्वेअर फूट एवढी जागा निवासस्थानासाठी उपलब्ध होऊ शकेल. झोपडपट्टीधारकांना जमीन हक्क प्रमाणपत्रे मिळावीत म्हणून ओडिशा सरकारने टाटा ट्रस्टसोबत सामंजस्य करार केला होता यासाठी एक सर्वेक्षणही करण्यात आले होते. 

Web Title: Land rights certificate for slum dwellers