‘कॉपी, पेस्ट’चे जनक लॅरी टेस्लर यांचे निधन

larry tesler
larry tesler

नवी दिल्ली - सध्याच्या काळात कॉम्प्युटर वापरताना काम सोपे करणाऱ्या कट, कॉपी, पेस्ट या संकल्पना प्रत्यक्षात आणणारे कॉम्प्युटर शास्त्रज्ञ लॅरी टेस्लर यांचे १७ फेब्रुवारीला वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.

१९४५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या लॅरी टेस्लर यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली होती. १९७३ मध्ये झेरॉक्सच्या पॉलो आल्टो रिसर्च सेंटरमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या टेस्लर यांनी कट, कॉपी, पेस्ट ही संकल्पना शोधली. 

१९८० मध्ये लॅरी टेस्लर यांनी अॅपलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अॅपलने त्या वेळी कॉम्प्युटर निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले होते. स्टिव्ह जॉब्ज हे त्याचे नेतृत्व करीत होते. त्यामुळेच लॅरी टेस्लर त्या कंपनीमध्ये गेले. लिसा आणि इतर अॅपल उत्पादनांच्या निर्मितीमध्ये त्यांचे प्रमुख योगदान होते. 

अॅपलमधून बाहेर पडल्यावर २००१ ते २००५ मध्ये त्यांनी अॅमेझॉनमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी ‘याहू’मध्येही काम केले. २००९ पासून ते सल्लागार म्हणून स्वतंत्रपणे काम करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com