लष्करे तय्यबाचा कमांडर युसूफ लट्टू ठार

लष्कराने आज सकाळी केलेल्या कारवाईत लष्करे तय्यबाचा टॉप कमांडर युसूफ लट्टू याच्यासह दोन दहशतवादी ठार
Lashkar-e-Tayyaba commander Yusuf Lattu killed Counterterrorism Srinagar
Lashkar-e-Tayyaba commander Yusuf Lattu killed Counterterrorism Srinagarsakal

श्रीनगर : लष्कराने आज सकाळी केलेल्या कारवाईत लष्करे तय्यबाचा टॉप कमांडर युसूफ लट्टू याच्यासह दोन दहशतवादी ठार केले. बारामुल्ला जिल्ह्यातील मालवाह भागात झालेल्या चकमकीदरम्यान तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाले. पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील मालवाह भागात दहशतवादी असल्याची खबर लागली.

त्यानंतर जवानांनी परिसराला घेरले आणि तपास सुरू केला. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यात लष्करे तय्यबाचा टॉप कमांडर युसूफ कंतरूचा समावेश होता. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यावेळी तीन जवान किरकोळ जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. कंतरू हा काश्‍मीर खोऱ्यातील अनेक घातपाती कारवायांत सामील होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com