esakal | जगन्नाथ मंदिरातील शेवटच्या देवदासीचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Jagannath temple

ओडिशाच्या पुरीमधील जगप्रसिद्ध भगवान श्री जगन्नाथ मंदिरातील शेवटच्या देवदासीचे निधन झाले आहे. त्या 90 वर्षाच्या होत्या

जगन्नाथ मंदिरातील शेवटच्या देवदासीचे निधन

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

पुरी- ओडिशाच्या पुरीमधील जगप्रसिद्ध भगवान श्री जगन्नाथ मंदिरातील शेवटच्या देवदासीचे निधन झाले आहे. त्या 90 वर्षाच्या होत्या. वृद्धावस्थेमुळे आरोग्य विषयक व्याधींनी त्या ग्रस्त होत्या. मंदिरातील सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. पारसमणी लोकांच्या मदतीने मंदिराच्या बलीसाही भागात एका किरायाच्या घरात राहायच्या. जगन्नात पुरी यात्रेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. अशात शतकांपासून सुरु असलेल्या देवदासी प्रथेचा शेवट झाला आहे. (Last Devadasi Mahari Parasmani of Jagannath temple passes away at 92)

ओडिशा सरकारने 1955 च्या एका अधिनियमान्वये पुरी शाही परिवाराकडून मंदिराचे प्रशासन स्वत:कडे घेतले होते. त्यानंतर मंदिरातून देवदासी पद्धत हळूहळू समाप्त होत गेली. मंदिरात दोन प्रकारच्या देवदासी होत्या. नर्तक आणि गायिका. पारसमणी एक गायिका होत्या, ज्या मंदिरात गीत गोविंद सारखे भक्ती गीत गायच्या. सर्व देवदासींचे लग्न भगवान जगन्नाथासोबत झाले होते. जगन्नाचा पती म्हणून स्वीकार करत देवदासी आयुष्यभर कुमारिका राहायच्या.

हेही वाचा: शरद पवारांच्या 'ती लहान माणसं' वक्तव्यावर पटोलेंची प्रतिक्रिया

पारसमणी यांना कुंगनमणी देवदासीने दत्तक घेतले होते. पारसमणी यांनी देवदासी होण्याचं प्रशिक्षण वयाच्या 7 व्या वर्षापासून सुरु केलं होतं. मंदिरातील रिकॉर्डनुसार, 100 वर्षांपूर्वी मंदिरात एकूण 25 देवदासी होत्या. 1980 पर्यंत केवळ 4 देवदासी मंदिरात होत्या. त्यातील तिघींचा यादरम्यान मृत्यू झाला. अखेर भगवान श्री जगन्नाथ मंदिरातील शेवटच्या देवदासीचेही निधन झाले आहे. दरम्यान, देशात देवदासी प्रथा संपुष्टात आली आहे.

loading image