तेलंगणात केवळ दोनच मंत्र्याचे मंत्रीमंडळ!

वृत्तसंस्था
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

तेलंगणात डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाला बहुमत मिळाले. बहुमत मिळाल्याने या पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखरराव यानी 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी मंत्री म्हणुन फक्त मोहम्मद अली या माजी उपमुख्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली त्यानंतर आजतागयत तेलंगणात मंञीमंडळाचा विस्तार झालेला नाही, यामुळे तेलंगणात केवळ दोन मंत्र्याचेच मंत्रीमंडळ आहे.

हैद्राबाद- तेलंगणात डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाला बहुमत मिळाले. बहुमत मिळाल्याने या पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखरराव यानी 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी मंत्री म्हणुन फक्त मोहम्मद अली या माजी उपमुख्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली त्यानंतर आजतागयत तेलंगणात मंञीमंडळाचा विस्तार झालेला नाही, यामुळे तेलंगणात केवळ दोन मंत्र्याचेच मंत्रीमंडळ आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा जोतिष्य, मुहूर्त यांच्यावर खूप विश्वास आहे. प्रत्येक गोष्ट ते मुहूर्त पाहूनच करतात. मग ते निवडणुकीसाठी फॉर्म भरणं असो की राजीनामा देणं प्रत्येक गोष्टीसाठी ते ज्योतिषाची मदत घेतता. तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र अजुनही राव यांनी मंत्री मंडळाचा विस्तार केलेला नाही. कारण मुहूर्त सापडेना असं दिलं जात आहे.

एखाद्या राज्यात निवडणुकीनंतर लोकनियुक्त सरकार येतं किंवा काही कारणांमुळे राष्ट्रपती राजवट लागू होते मात्र निवडणुका होऊन दोन महीने लोटल्यानंतरही केवळ एक मुख्यमंत्री आणि एक मंत्री राज्य चालवताहेत ही वस्तुस्थिती आहे. तेलंगणात निवडणुकीच्या दोन महीन्यानंतरही केवळ मुख्यमंत्री केसीआर आणि एकच मंत्री संपुर्ण राज्य चालवत आहेत.

Web Title: last two months no cabinet expansion in telangana