लता मंगेशकर यांचे सावरकरांच्या टिकाकारांना उत्तर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर लतादीदींनी हे ट्विट केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल देशभर त्यांना अभिवादन करण्यात आले. पण सावरकरांच्या व्यक्तीमत्त्वाला विरोध करणारा वर्गही समाजात आहे. यावर्षीही सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. ज्यावर स्वातंत्र्यवीरप्रेमींनीही उत्तरे दिलीत. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही या वादात आता उडी घेतली आहे.

'जे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलत आहेत, त्यांना सावरकरांच्या देशभक्तीबद्दल आणि स्वाभिमानाबद्दल माहित नाही,' असे ट्विट लतादीदींनी केले आहे. 

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर लतादीदींनी हे ट्विट केले आहे. बघेल म्हणाले होते की, 'वीर सावरकर यांनी दोन राष्ट्राची संकल्पना आणण्याचा विचार मांडला होता. त्यानंतर मोहम्मद जिन्ना यांनी ही संकल्पना स्वीकारली.'

lata_mangeshkar

बघेल यांचे वक्तव्य लतादीदींना फारसे रुचले नाही. यावर दीदींनी ट्विट करत म्हटले आहे की, 'नमस्कार, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. मी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला, देशभक्तीला प्रणाम करते. आजकाल काही लोक सावरकर यांच्या विरोधात बोलतात, पण त्या लोकांना सावरकर हे किती मोठे देशभक्त होते आणि स्वाभिमानी होते हे माहित नाही.'

 

भूपेश बघेल सावरकर यांच्याबद्दल म्हणाले होते की, 'सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली. तुरुंगात गेल्यानंतर इंग्रजांना माफी मागणारे अनेक पत्रे लिहिली. त्यानंतर तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी स्वतंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lata Mangeshkar tweeted for Veer Savarkars Critics