esakal | राज्यात रुग्णांची विक्रमी वाढ ते रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवली; ठळक बातम्या क्लिकवर

बोलून बातमी शोधा

aaj divasbharat

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

राज्यात रुग्णांची विक्रमी वाढ ते रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवली; ठळक बातम्या क्लिकवर
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा हाहाकार पाहता विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतर दिवशी सुद्धा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येवर राज्यात चिंतेचं वातावरण असून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कोविड परिस्थितीवर राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत.. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान १५ दिवसांचा लोकडाऊन गरजेचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व कॅबिनेट लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेतला. जर मुख्यमंत्र्यांनी मान्य केले, तर १५ दिवसांचा राज्यात लॉकडाउन लागू शकले,  असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (ता.११) जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. उपराजधानीसह ग्रामीण भागात कोरोनाचा महाउद्रेक सुरु आहे. दिवसाआड कोरोनाबाधितांचा नवीन रेकॉर्ड तयार होत आहे. यामुळे खाटांची संख्याअपुरी पडत आहे. मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांत खाटाच शिल्लक नाहीत. यामुळे नागपुरातील रुग्णांना अमरावतीला हलवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. कोरोनाचा धोका अधिक गहरा होत आहे. रविवारी आढळून आलेल्या ७ हजार २०१ बाधितांची संख्या लक्षात घेता दर तासाला ३०० जणांना कोरोनाची बाधा होत आहे. 

Corona Update:गेल्या 24 तासांत राज्यात 63 हजार 294 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 34 हजार 008 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर-

रेमडेसिव्हिरसाठी शहरात औषध दुकानांबाहेर रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे. यावरुन सुरु असलेला गोंधळ थांबवण्याासाठी जिल्हा प्रशासनानं एक महत्वाचं पाऊल उचललं असून विशेष 'कन्ट्रोल रुम'ची स्थापना करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर-

कोरोनाचा महाविस्फोट!  नागपुरात गेल्या २४ तासात तब्बल ७२०१ बाधित, दर दोन तासाला ५ मृत्यू. वाचा सविस्तर-

पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षीप्रमाणं आत्ताही मदतीसाठी तयारी दर्शवली आहे. ज्या राज्यांकडे रुग्णांच्या आयसोलेशनसाठी बेड उपलब्ध नसतील त्यांना रेल्वेचे कोचेस उपलब्ध करुन देण्यात येतील असं रेल्वेनं म्हटलं आहे. वाचा सविस्तर-

बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेते कबीर बेदी यांची चर्चा सर्वोत्तम कलाकारांमध्ये होते. कबीर बेदी हे केवळ आपल्या प्रोफेशनल करिअरमुळेच चर्चेत राहिले असे नाही तर ते त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही सर्वांच्या चर्चेचा विषय राहिले आहेत. बायोग्राफी 'स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर' (Stories I Must Tell) असं त्या पुस्तकाचे नाव आहे. त्यात त्यांनी आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयी बरेचसे खुलासे केले आहेत. वाचा सविस्तर-

केंद्र सरकारने आता रेमेडेसिव्हीर औषधाची परदेशातील निर्यात थांबवली आहे. देशातील परिस्थिती जोवर सुधारत नाही तोवर या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वाचा सविस्तर-

येत्या तीन महिन्यांत भारतात आणखी पाच कंपन्यांची लस दाखल होणार आहे. त्यातच रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' या लसीला भारतात आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. वाचा सविस्तर-

चीनचं सगळं उलटच; कोरोनावर मात करण्यासाठी लशी 'मिक्स' करण्याचा फंडा. वाचा सविस्तर-

स्फोटकांच्या कटात सामील असणे आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणे या आरोपांखाली सचिन वाझेचा सहकारी रियाज काझीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर-

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान १५ दिवसांचा लोकडाऊन गरजेचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व कॅबिनेट लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेतला. जर मुख्यमंत्र्यांनी मान्य केले, तर १५ दिवसांचा राज्यात लॉकडाउन लागू शकले,  असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. वाचा सविस्तर-