esakal | वाराणसीतील मशिदीचे पुरातत्त्व सर्वेक्षण ते जागतिक अर्थव्यवस्थेला भारतामुळे गती; ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

aaj divasbharat

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

वाराणसीतील मशिदीचे पुरातत्त्व सर्वेक्षण ते जागतिक अर्थव्यवस्थेला भारतामुळे गती; ठळक बातम्या क्लिकवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. हे प्रकरण गंभीर असल्यानं त्याची चौकशी होणं गरजेच आहे अशी टिपण्णीही सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केली. मास्टर ब्लास्टर अर्थात सचिन तेंडूलकर कोरोनाच्या संसर्गातून बरा होत असून गुरुवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर पुढील काही दिवस त्याला होम क्वारंटाइन रहावं लागणार आहे. २७ मार्च रोजी सचिन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली होती. कोरोनाचे संक्रमण अत्यंत तीव्र गतीने पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना आपल्या कचाट्यात ओढू  पाहत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या दोनवेळा एक लाखाच्या पार गेली आहे. आणि आता या दरम्यानच केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन हे कोरोना संक्रमित झाले आहेत. बिजापूरमध्ये सुरक्षा रक्षकांवर केलेल्या हल्ल्यावेळी नक्षलवाद्यांनी अपहरण केलेले कोब्रा युनिटचे जवान राकेश्वर सिंह मनहस यांची सुटका करण्यात आली आहे

मास्टर ब्लास्टर अर्थात सचिन तेंडूलकर कोरोनाच्या संसर्गातून बरा होत असून गुरुवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वाचा सविस्तर-

पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबद्दल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले. वाचा सविस्तर-

३ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह यांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं. दरम्यान, राकेश्वर सिंह यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरी जणू दिवाळीच साजरी केली. वाचा सविस्तर-

काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीची इमारत याचे पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याची परवानगी आज वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिली आहे. वाचा सविस्तर-

Corona Update: ल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 56 हजार 286 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 36 हजार 130 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. वाचा सविस्तर-

जागतिक अर्थव्यवस्थेला सध्या वेग येत असून अमेरिका, चीन आणि भारतातील अर्थव्यवस्था बळकट होत असल्याने हा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी आज सांगितले. वाचा सविस्तर-

राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. हे प्रकरण गंभीर असल्यानं त्याची चौकशी होणं गरजेच आहे अशी टिपण्णीही सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केली. वाचा सविस्तर-

इम्रान खान यांच्या बलात्कारावरील वक्तव्यावरुन घटस्फोटीत पत्नीने सुनावलं, म्हणाली...वाचा सविस्तर-

'१५ दिवसांत महाविकास आघाडीच्या आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील', असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. वाचा सविस्तर-

Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी 'निकाल' विरोधात गेला, तर उद्रेक होईल; खासदार उदयनराजेंचा सरकारला गर्भित इशारा. वाचा सविस्तर-
 

loading image